Pirangut

Pirangut
city
Pirangut
Location in Maharashtra, India
Pirangut
Pirangut (India)
Coordinates: 18°30′41″N 73°40′48″E / 18.5115°N 73.6801°E / 18.5115; 73.6801Coordinates: 18°30′41″N 73°40′48″E / 18.5115°N 73.6801°E / 18.5115; 73.6801
Country  India
State Maharashtra
District Pune
Population (2011)
  Total 14,174
Languages
  Official Marathi
Time zone UTC+5:30 (IST)

Pirangut is a census town in Pune district in the Indian state of Maharashtra.

Demographics

Pirangut, Tal. Mulshi. Di. Pune had a population of 14174. Males constitute 52% of the population and females 48%. Bhare ( 1 KM ) , Kasaramboli (3 KM), Mulkhed (4 KM ), Lavale (4 KM) , Mulkhed (4 KM) are the nearby Villages to Pirangut.[1] This are an industrial irea developed near Pirangut. पिरंगुट हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून च गाव आहे, प्रियंगुवात किंवा प्रियवंतन चा अपभ्रंश होऊन पिरंगुट हे नाव पडले आहे, हिंदवी स्वराज्याचे पाहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचं गाव, समाधीस्थळ, आहे गावात त्यांचे वंशज गावात पुणेत राहतात, मुख्य आडनाव गावात गोळे आहेत, पवळे, आहेर, नलावडे, निकटे,वाघ, मते, लिंबोरे, चौधरी, खडके, दळवी, दगडे, परगे, नवले राहतातविंझाई देवी ची गुहा प्रेक्षणीय आहे

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित श्री जगदीश्वर मंदिर देखणं आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायदळी सरनौबत असणारे महान पराक्रमी सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचं गाव


जुन्या तालमी आहेत शिवकालीन हनुमान मंदिर

छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस पिलाजी गोळे यांच्या वाड्यावर मुक्कामी होते

भोर संस्थान कालीन सरकारी दवाखाना, ब्रिटिशांनी बांधलेला पहिला तारेचा पूल प्रेक्षणीय आहे

कुंभळजाई12 माही कुंड प्रेक्षणीय आहे

विंझाई नदीचे पात्र आजही आहे

अनेक

  • ऐतिहासिक भैरवनाथ पालखी सोहळा, पिरंगुट*

हिंदवी स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात मिर्झाराजे चे मुघली सैनिक धुमाकूळ घालत होते, काळ भयाण होत चालला होता, राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज व सर्व अष्ठप्रधान मंडळ चर्चा मसलत करत होते चोहो बाजूनी स्वराज्य वर संकट उभे राहिले होते, इ स 1665 मार्च महिन्यात कोकणातून राजगडावर येणारी रसद दोन वेळा शत्रू च्या तावडीत सापडली होती, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज अनेक ठिकाणी, आघाडीवर झुंज देत होते, जागोजागी रणसंग्राम होत होते, पारडं आपलंच भारी होतं होत, पण मिर्झाराजे हा वयाने आणि अनुभवाने छत्रपती पेक्षा मोठा होता, शिवाय लाखो मुघलांच्या सैनिकांच्या मानाने आपले मावळे फारच कमी होते पण हार मानणारे नव्हते.... तोडीस तोड आणि जशास तसे उत्तर देत होते... राजगडावरून निघालेली आज्ञा म्हणजे प्रत्येक मावळ्यांना एक प्रकारे पराक्रम करण्यासाठी प्रेरणा व ऊर्जा मिळत असे.. अशाच उन्हाळ्यात मार्चचा तो महिना होता, हनुमान जन्मोत्सव स्वराज्या मध्ये गावोगावी साजरा होत होता...

पण *पिरंगुट* ला नरवीर सरदार पिलाजी गोळे त्यावेळी नव्हते ते मंगळगडच्या परिसरात मोहिमेत अडकले होते....

  • पिरंगुट* ला त्या दिवशी *संताजी गोळे* आणि त्यांचे इतर भाऊ, भावकी मधील पैलवान मंडळी होती,

नव्या दमाचे नवजवान गडी, रांगडी बाणा असलेले गोळे घराणे...

राजगड वरून लखोटा आला होता, की *पौड*, *ताम्हिणी* भागात कुतुबुधीखान,आणि दाऊदखान हे स्वतः आणि 20 हजार फौज घेऊन धुडगूस घालत होते, या दोघांनाही अनेक निरपराध लोकांना कैद करून त्यांची संपत्ती आपल्या ताब्यात ठेवली होती, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज लोहगड वर पोहचून मोठ्या फौजा फाटा घेऊन चालून येत असलेल्या बातम्या मिर्झा राजे ना समजल्या, मिर्झाराजे नी त्याच्या या सरदार ना आज्ञा देऊन लोहगड च्या दिशेने रवाना केले, हे दोघे मुघली सरदार लोहगड जवळ पोहोचतच मराठा किल्लेदाराने गडाचे दरवाजे उघडून 500 मावळ्यांना त्यांच्या अंगावर तुटून पडायला सांगितले, रणसंग्राम झाला....

एकच कापाकापी सुरू झाली, पण लगेचच रायसिंह, अचलसिंह, आणि कुतुब खान यांनी आघाडी सांभाळून जोरदार हल्ला केला, या बळकट हल्ल्याने मराठयांनी माघार घेतली, दुर्दैवाने या हल्ल्यात मराठयांच्या नुकसानीत वाढ झाली, लोहगड, तुंग, तिकोना,, विसापूर, मोरगिरी, हा संपूर्ण प्रदेश, दाऊद खानाने लुटून जाळून टाकला, या नंतर मुघली सैनिक पुणेत परतले, पण मराठयांच्या काही तुकड्या पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असल्याचे समजले मिर्जाराजाने, दाऊद खानाने पुन्हा *पौड खोऱ्यात हल्ला केला, घोटावडे, मूलखेड, दारवली, सावरगाव* हि गावे बेचिराख झाली, , पण *पिरंगुटला संताजी गोळे* आणि त्याच्या पैलवान मावळ्यांनी निकारची झुंज दिली पण शत्रू भारी पडला, यशस्वी माघार घेऊन मागे फिरले या लढाईत जवळपास 300 माणसे आणि 4500 जनावरे कैद करून दाऊद खान पुणेत गेला....

परिसरात वातावरण गंभीर झाले होते.....

  • संताजी गोळे आणि इतर गोळे* मंडळी पेटून उठले होते.....

मंगळगडावर बातमी कळली *सरदार पिलाजी गोळेना*.... *संताजी, गोदाजी, आणि इतर गोळे मंडळीना* निरोप पाठवला की आरपार ची लढाई झाली तरी बेहत्तर माघार घेऊ नका, इकडची *छत्रपती शिवाजी महाराजांनी* दिलेली कामगिरी चोख बजावून मी स्वतः नव्या दमाची फौज घेऊन येतो तोपर्यंत पौड खोरं शत्रू च्या ताब्यात जाता कामी नये....

मग काय *पिलाजीरावांची* अशी प्रेरणा मिळाली .... गोळेंच्या अंगात 12 हत्तीचं बळ संचारल होतं...

  • हनुमान जन्मोत्सव* (1665),

च्या आदल्या दिवशी *निवे (मुळशी तालुका)*, कोकण मधून येणारी रसद दाऊद खान पुन्हा लूटमार करणार होता....

  • संताजी आणि त्यांची फौज उरवडे, बेलावडे, चिंचवड, कोंढवळे, अकोले करत मुळशीचा डोंगर चढून आपल्या येणाऱ्या रसद वर लक्ष ठेवत प्रवास करत होते,* आणि अचानक काही समजण्याच्या आत मुघली सैनिक *वांद्रे, वडस्ते* कडून घुसले

एकच खळबळ उडाली, तलवार, भाले कचाकचा चालले होते, कापाकापी उडाली, शत्रू 8000 च्या आसपास होता आणि संताजी आणि त्याचे साथीदार 700 होते, रसद बरोबर 100 जण असतील असे 800 विरुद्ध 8000 घमासान रणसंग्राम उडाला...

  • संताजीची तलवार म्हणजे पिलाजी गोळेच्या तलवारी सारखी चालली होती,* रक्ताच्या पिचकाऱ्या उडत होत्या, गोळे आणि इतर सगळे मावळे एकत्र जोरात लढत होते,

मुघली सैनिक अचंबित झाले होते, काय हे चिवट मावळे....

शत्रूच्या घोटत हाहाकार माजलं होता, सहज रसद मिळवणे हे त्यांचं स्वप्न जवळपास धुळीला मिळालं होतं डोंगर दरीचा दांडगा अनुभव, असल्याने सरशी आपलीच होत होती....

पण शत्रूच्या संख्येत वाढ झाली त्यानं नव्या दमाची कुमक मिळाली होती शिवाय आपली कुमक गेले 12 ते 13 दिवस धावपळीमुळे तशी थकलेली होती पण माघार घेणारी नव्हती अखेर शेवटी घमासान लढाईत वीर *संताजी गोळे* यांना वीर मरण आले अनेक मावळे कामी आले....

पण *पराक्रम* झाला......रणझुंझार मावळ्यांना मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻

पुढे *छत्रपती शिवाजी महाराज* यांनी पुरंदर लढाई आणि इतर अनेक पैलूंचा विचार करून पुरंदरचा तह केला...

पुढचा इतिहास आपल्याला माहीतच आहे....

पण काळाच्या ओघात या अपरिचित लढाईत *वीर योद्धा संताजी गोळे* मात्र मनात कायमचं घर करून गेला.....

  • या लढाई नंतर गोळे घराणे ने त्या लढाईच्या ठिकाणी भैरवनाथ ची मूर्ती बसवली.... म्हणतात की भैरवनाथ स्वतः आशीर्वाद देऊन मावळ्यांना एक प्रकारे ऊर्जा देत होते....*
  • ...आज 352 वर्ष पूर्ण झाली.... पिरंगुटचे गोळे घराणे, आहेर ,नलावडे, पारगे, गोंडेकर, चौधरी, खडके, दळवी, लिंबोरे, दगडे, पवार परिवार निवेगावात (ताम्हिणी घाट) जाऊन त्याठिकाणी असलेली भैरवनाथांची मूर्ती ,पूजन, किर्तन, भजन व जागरण त्याठिकाणी पिढ्यानपिढ्या करत आहे...*

अतिशय उत्स्फूर्तपणे पालखी सोहळा संपन्न होत असतो....

मुळशी तालुक्यात नव्हे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पवित्र आणि ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे पालखी सोहळ्याला.......

असा हा महान पंरपरा असलेला पालखी सोहळा चैत्र पौर्णिमा आणि नंतरचा दिवस चैत्र कृ.1 ला संपन्न होत असतो......

  • पिरंगुटकर सालाबादप्रमाणे ह्यावर्षी पण हर्ष आणि उल्हासित भावनेने आपल्या पिरंगुटचा (गोळे आळी) भैरवनाथाचा उद्या चैत्र कृ.1 ला रविवारी दि. 1/4/2018 रोजी भैरवनाथांचा दरवर्षीप्रमाणे पांरपांरीक पद्धतीने भैरवनाथ देवाचा उत्साहात वाढदिवस साजरा केला जाणारा आहे... तरी सर्वांनी उद्या सकाळी 8.30 वाजता निवे (ताम्हिणी घाट), ता. मुळशी जि.पुणे येथे महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेण्यास यावे....*
  • तसेच उद्या संध्याकाळी 7:00 वाजता गोळे आळी (पिरंगुट) भैरवनाथ मंदीरामध्ये विधीवत पुजाअर्चा, महाआरती, पालखी सोहळा व मिरवणुकीचा कार्यक्रम होईल तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती .......*
  • !!भैरवनाथांचा नावानं चागंभल!!


  • आवर्जून भेट द्या....*
  • शेती कुस्ती राष्ट्रभक्ती...*
  • सरनौबत नरवीर पिलाजी गोळे.....*
  • जय शिवराय
पैलवान या गावात होऊन गेलेत

References

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.