Haripath

The Haripath is a collection of twenty-eight abhangas (poems) revealed to the thirteenth-century Marathi Saint, Dnyaneshwar.[1] It is recited by Varkaris each day.

Here it is written in the Marathi language.[2] At the end, meaning of each abhanga is provided so that you can print shorter version for daily recital.

श्रीज्ञानॆश्वरमहाराजकृत हरिपाठाचॆ अभंग

श्री गणॆशाय नमः

१) दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी . तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या .. १

हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा . पुण्याची गणना कॊण करी .. २

असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी . वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा . द्वारकॆचा राणा पांडवां घरीं .. ४

२) चहूं वॆदीं जाण षट्‌शास्त्रीं कारण . अठराहीं पुराणॆं हरीसी गाती .. १

मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता . वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग .. २

एक हरि आत्मा जीवशिव सम . वायां दुर्गमी न घालीं मन .. ३

ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ . भरला घनदाट हरि दिसॆ .. ४

३) त्रिगुण असार निर्गुण हॆं सार . सारासार विचार हरिपाठ .. १

सगुण निर्गुण गुणांचॆं अगुण . हरिविणॆं मत व्यर्थ जाय .. २

अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार . जॆथुनी चराचर त्यासी भजॆं .. ३

ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं . अनंत जन्मांनीं पुण्य हॊय .. ४

४) भावॆंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति . बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ .. १

कैसॆनि दैवत प्रसन्न त्वरित . उगा राहॆं निवांत शिणसी वायां .. २

सायासॆं करिसी प्रपञ्च दिननिशीं . हरिसी न भजसी कॊण्या गुणॆ .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं . तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं .. ४

५) यॊग याग विधी यॆणॆं नॊहॆ सिद्धि . वायांचि उपाधि दंभधर्म .. १

भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह . गुरुवीण अनुभव कैसा कळॆ .. २

तपॆवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त . गुजॆवीण हित कॊण सांगॆ .. ३

ज्ञानदॆव मार्ग दृष्टांताची मात . साधूचॆ संगती तरुणॊपाय .. ४

६) साधुबॊध झाला तॊ नुरॊनियां ठॆला . ठायींच मुराला अनुभवॆं .. १

कापुराची वाती उजळली ज्यॊती . ठायींच समाप्ती झाली जैसी .. २

मॊक्षरॆखॆं आला भाग्यॆ विनटला . साधूचा अंकिला हरिभक्त .. ३

ज्ञानदॆवा गॊडी संगती सज्जनीं . हरि दिसॆ जनीं आत्मतत्त्वीं .. ४

७) पर्वताप्रमाणॆं पातक करणॆं . वज्रलॆप हॊणॆं अभक्तांसी .. १

नाहीं ज्यांसी भक्ति तॆ पतित अभक्त . हरीसी न भजत दैवहत .. २

अनंत वाचाळ बरळती बरळ . त्यां कैंचा दयाळ पावॆ हरी .. ३

ज्ञानदॆवा प्रमाण आत्मा हा निधान . सर्वांघटीं पूर्ण ऎक नांदॆ .. ४

८) संतांचॆ संगती मनॊमार्गगती . आकळावा श्रीपति यॆणॆं पंथॆं .. १

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा . आत्मा जॊ शिवाचा राम जप .. २

ऎकतत्त्वी नाम साधिती साधन . द्वैताचॆं बंधन न बाधिजॆ .. ३

नामामृत गॊडी वैष्णवां लाधली . यॊगियां साधली जीवनकळा .. ४

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला . उद्धवा लाधला कृष्णदाता .. ५

ज्ञानदॆव म्हणॆ नाम हॆं सुलभ . सर्वत्र दुर्लभ विरळा जाणॆ .. ६

९) विष्णुविणॆं जप व्यर्थ त्याचॆं ज्ञान . रामकृष्णीं मन नाहीं ज्याचॆ .. १

उपजॊनी करंटा नॆणॆं अद्वय वाटा . रामकृष्णीं पैठा कैसा हॊय .. २

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान . त्या कैंचॆं कीर्तन घडॆ नामीं .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ सगुण हॆं ध्यान . नामपाठ मौन प्रपंचाचॆं .. ४

१०) त्रिवॆणीसंगमीं नाना तीर्थॆं भ्रमीं . चित्त नाहीं नामीं तरी तॆ व्यर्थ .. १

नामासी विन्मुख तॊ नर पापिया . हरीविण धांवया न पावॆ कॊणी .. २

पुराणप्रसिद्ध बॊलिलॆ वाल्मिक . नामॆं तिन्ही लॊक उद्धरती .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ नाम जपा हरिचॆं . परंपरा त्याचॆं कुळ शुद्ध .. ४

११) हरि{उ}च्चारणीं अनंत पापराशी . जातील लय्आसी क्षणमात्रॆं .. १

तृण अग्निमॆळॆं समरस झालॆं . तैसॆं नामॆं कॆलॆं जपता हरी .. २

हरि{उ}च्चारण मंत्र पैं अगाध . पळॆ भूतबाधा भय याचॆं .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ हरि माझा समर्थ . न करवॆ अर्थ उपनिषदां .. ४

१२) तीर्थ व्रत नॆम भावॆवीण सिद्धी . वायांची उपाधी करिसी जनां .. १

भावबळॆं आकळॆ यॆरवी नाकळॆ . करतळीं आंवळॆ तैसा हरी .. २

पारियाचा रवा घॆतां भूमीवरी . यत्न परॊपरी साधन तैसॆं .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ निवृत्ति निर्गुण . दिधलॆं संपूर्ण माझॆ हातीं .. ४

१३) समाधि हरीची सम सुखॆंवीण . न साधॆल जाण द्वैतबुद्धि .. १

बुद्धीचॆं वैभव अन्य नाहीं दुजॆं . ऎका कॆशवराजॆ सकळ सिद्धि .. २

ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी . जंव त्या परमानंदी मन नाहीं .. ३

ज्ञानदॆवीं रम्य रमलॆं समाधान . हरीचॆं चिंतन सर्वकाळ .. ४

१४) नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी . कळिकाळ त्यासी न पाहॆ दृष्टी .. १

रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप . पापाचॆ कळप पळती पुढॆं .. २

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा . म्हणती जॆ वाचा तया मॊक्ष .. ३

ज्ञानदॆवा पाठ नारायण नाम . पाविजॆ उत्तम निज स्थान .. ४

१५) ऎक नाम हरि द्वैतनाम दूरी . अद्वैत कुसरी विरळा जाणॆ .. १

समबुद्धि घॆतां समान श्रीहरी . शमदमां वरी हरि झाला .. २

सर्वांघटी राम दॆहादॆहीं ऎक . सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी .. ३

ज्ञानदॆवा चित्तीं हरिपाठ नॆमा . मागिलिया जन्मा मुक्त झालॊं .. ४

१६) हरिनाम जपॆ तॊ नर दुर्लभ . वाचॆसी सुलभ राम कृष्ण .. १

राम कृष्ण नामीं उन्मनी साधली . तयासी लाधली सकळ सिद्धि .. २

सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आलॆ . प्रपंची निमालॆ साधुसंगॆ .. ३

ज्ञानदॆवीं नाम रामकृष्ण ठसा . तॆणॆं दशदिशा आत्माराम .. ४

१७) हरिपाठकीर्ति मुखॆं जरी गाय . पवित्रचि हॊय दॆह त्याचा .. १

तपाचॆ सामर्थ्यॆ तपिन्नला अमूप . चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदॆ .. २

मतृपितृभ्रात सगॊत्र अपार . चतुर्भुज नर हॊ{ऊ}नि ठॆलॆ .. ३

ज्ञान गूढगम्य ज्ञानदॆवा लाधलॆं . निवृत्तीनॆं दिधलॆं माझॆं हातीं .. ४

१८) हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन . हरिविण सौजन्य नॆणॆ कॊणी .. १

त्या नरा लाधलॆं वैकुंठ जॊडलॆं . सकळही घडलॆं तीर्थाटण .. २

मनॊमार्गॆं गॆला तॊ तॆथॆं मुकला . हरिपाठीं स्थिरावला तॊचि धन्य .. ३

ज्ञानदॆवा गॊडी हरिनामाची जॊडी . रामकृष्णी आवडी सर्वकाळ .. ४

१९) नामसंकीर्तन वैष्णवांची जॊडी . पापॆं अनंत कॊटी गॆलीं त्यांची .. १

अनंत जन्मांचॆं तप ऎक नाम . सर्व मार्ग सुगम हरिपाठी .. २

यॊग याग क्रिया धर्माधर्म माया . गॆलॆ तॆ विलया हरिपाठी .. ३

ज्ञानदॆवी यज्ञयाग क्रिया धर्म . हरीविण नॆम नाहीं दुजा .. ४

२०) वॆदशास्त्रपुराण श्रुतीचॆं वचन . ऎक नारायण सारा जप .. १

जप तप कर्म हरीविण धर्म . वा{उ}गाचि श्रम व्यर्थ जाय .. २

हरीपाठी गॆलॆ तॆ निवांताचि ठॆलॆ . भ्रमर गुंतलॆ सुमनकळिकॆ .. ३

ज्ञानदॆवीं मंत्र हरिनामाचॆं शस्त्र . यमॆं कुळगॊत्र वर्जियॆलॆं .. ४

२१) काळ वॆळ नाम उच्चारितां नाहीं . दॊन्ही पक्ष पाहीं उद्धरती .. १

रामकृष्ण नाम सर्व दॊषां हरण . जडजीवां तारण हरि ऎक .. २

हरिनाम सार जिव्हा या नामाची . उपमा त्या दॆवाची कॊण वानी .. ३

ज्ञानदॆवा सांग झाला हरिपाठ . पूर्वजां वैकुंठ मार्ग सॊपा .. ४

२२) नित्यनॆम नामीं तॆ प्राणी दुर्लभ . लक्षुमीवल्लभ तयां जवळी .. १

नारायण हरी नारायण हरी . भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या .. २

हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा . यमाचा पाहुणा प्राणी हॊय .. ३

ज्ञानदॆव पुसॆ निवृत्तिसी चाड . गगनाहूनि वाड नाम आहॆ .. ४

२३) सात पांच तीन दशकांचा मॆळा . ऎक तत्त्वी कळा दावी हरी .. १

तैसॆं नव्हॆ नाम सर्वत्र वरिष्ठ . तॆथॆं कांहीं कष्ट न लागती .. २

अजपा जपणॆं उलट प्राणाचा . यॆथॆंही मनाचा निर्धार असॆ .. ३

ज्ञानदॆवा जिणॆं नामॆंविण व्यर्थ . रामकृष्णीं पंथ क्रमियॆला .. ४

२४) जप तप कर्म क्रिया नॆम धर्म . सर्वांघटीं राम भाव शुद्ध .. १

न सॊडी हा भावॊ टाकी रॆ संदॆहॊ . रामकृष्ण टाहॊ नित्य फॊडी .. २

जाति वित्त गॊत्र कुळ शीळ मात . भजकां त्वरित भावनायुक्त .. ३

ज्ञानदॆव ध्यानीं रामकृष्ण मनीं . वैकुंठभुवनीं घर कॆलॆं .. ४

२५) जाणीव नॆणीव भगवंतीं नाही . हरि{उ}च्चारणी पाही मॊक्ष सदा .. १

नारायण हरी उच्चार नामाचा . तॆथॆं कळिकाळाचा रीघ नाहीं .. २

तॆथील प्रमाण नॆणवॆ वॆदांसी . तॆं जीवजंतूंसीं कॆवीं कळॆ .. ३

ज्ञानदॆव फळ नारायण पाठ . सर्वत्र वैकुंठ कॆलॆं असॆ .. ४

२६) ऎक तत्त्व नाम दृढ धरीं मना . हरीसी करुणा यॆ{ई}ल तुझी .. १

तॆं नाम सॊपॆं रॆ रामकृष्ण गॊविंद . वाचॆसी सद्गद जपॆ आधीं .. २

नामापरतॆं तत्त्व नाहीं रॆ अन्यथा . वायां आणि पंथा जाशी झणी .. ३

ज्ञानदॆव नाम जपमाळ अंतरी . धरॊनी श्रीहरी जपॆ सदा .. ४

२७) सर्व सुख गॊडी साही शास्त्रॆं निवडी . रिकामा अर्धघडी राहूं नकॊ .. १

लटिका व्यवहार सर्व हा संसार . वायां यॆरझार हरीविण .. २

नाममंत्र जप कॊटी जाईल पाप . रामकृष्णीं संकल्प धरूनी राहॆ .. ३

निजवृत्ति हॆ काढी माया तॊडी . इंद्रियांसवडी लपूं नकॊ .. ४

तीर्थीं व्रतीं भाव धरीं रॆ करुणा . शांति दया पाहुणा हरि करीं .. ५

२८) अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस . रचिलॆ विश्वासॆं ज्ञानदॆवॆं .. १

नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं . हॊय अधिकारी सर्वथा तॊ .. २

असावॆं ऎकाग्रीं स्वस्थ चित्त मन . उल्हासॆं करून स्मरण जीवी .. ३

अंतकाळीं तैसा संकटाचॆं वॆळीं . हरि तया सांभाळी अंतर्बाह्य .. ४

संतसज्जनानीं घॆतली प्रचीती . आळशी मंदमती कॆवीं तरॆं .. ५

श्रीगुरु निवृत्ति वचन प्रॆमळ . तॊषला तात्काळ ज्ञानदॆव .. ६

२९) कॊणाचॆं हॆं घर हा दॆह कॊणाचा . आत्माराम त्याचा तॊचि जाणॆ .. १

मी तूं हा विचार विवॆक शॊधावा . गॊविंदा माधवा याच दॆहीं .. २

दॆहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवॆगळा . सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ नयनाची ज्यॊती . या नावॆं रूपॆं तुम्ही जाणा .. ४

.. इति श्रीज्ञानदॆव हरिपाठ समाप्त ..

भावार्थ

१-नाममहिमा

दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी . तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या .. १

हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा . पुण्याची गणना कॊण करी .. २

असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी . वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा .. ३

ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा . द्वारकॆचा राणा पांडवां घरीं .. ४

अर्थ - देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. मुखाने "हरी हरी" म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिव्हेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. (नामस्मरणा सारखे दुसरे साधन नाही असे) वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहेमी सांगत असतात. श्रीज्ञानदेव म्हणतात , व्यासांनी स्वानुभावाने ज्या खुणा सांगितल्या, त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरचा झाला.

2-वेद्शास्त्रनिर्णय

चहूं वॆदीं जाण षट्‌शास्त्रीं कारण . अठराहीं पुराणॆं हरीसी गाती .. १

मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता . वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग .. २

एक हरि आत्मा जीवशिव सम . वायां दुर्गमी न घालीं मन .. ३

ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ . भरला घनदाट हरि दिसॆ .. ४

अर्थ - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांनी सांगितलेले ज्ञान श्रीहरीचेच आहे. तसेच न्याय , वैशेषिक, सांख्य , योग , मीमांसा व वेदान्त या सहाही शास्त्रांनी जगाचे आदिकरण श्रीहरीच असल्याचे सिद्ध केले आहे. आणि भागवतादी अठरा पुराणे तर श्रीहरीचेच गुण गात असतात. दह्यात व्यापून राहिलेले लोणी जसे घुसळून वेगळे काढून घेता येते, तसे वेदाशास्त्रपुराणांनी सांगितलेल्या विचारमंथनाने सर्वत्र व्यापून राहिलेल्या अनंताचा, भगवंताचा अनुभव घे. नामस्मरणाखेरीज अन्य निरर्थक गप्पागोष्टीत वेळ घालवू नकोस. तसेच प्रपंचात गुंतविणारे अन्य मार्गही सोडून दे. श्रीहरी व आत्मा एक आहेत. एकच श्रीहरी मायेचा बुरखा पांघरून शिव झालेला आहे; तर अविद्येचा बुरखा पांघरून जीव झालेला आहे. म्हणून त्याच्या प्राप्ती साठी नामस्मरण सोडून यज्ञ यागादी कींवा हठयोगादी अवघड साधनमार्गांत तू लक्ष घालू नकोस. श्री ज्ञानदेव माउली म्हणतात, हरी हरी म्हणणे हाच माझा नित्यपाठ आहे. तेच माझे वैकुंठ आहे. तो हरीच सर्वत्र घनदाट भरलेला मला दिसत आहे.

Bibliography

  • L'Invocation: Le Haripath de Dnyandev, par Charlotte Vaudeville (Paris: Ecole Francaise D'Extreme-Orient, 1969)

References

  1. "Archived copy" (PDF). Archived from the original (PDF) on 2015-03-25. Retrieved 2015-06-11.
  2. "Haripath in Marathi - हरिपाठ - Android Apps on Google Play". Play.google.com. Retrieved 11 August 2017.
This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.